जनगणना
विभागाची माहिती (About Census
Department)
भारत
सरकारमार्फत दर 10 वर्षांनी राष्ट्रीय स्तरावर जनगणना प्रक्रिया राबविण्यात येते. जनगणना ही देशातील लोकसंख्या,
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगार व राहणीमानाशी संबंधित
महत्त्वाची माहिती संकलित करण्याची अधिकृत प्रक्रिया आहे.
जनगणना
माहितीच्या आधारे शासन विविध विकास
योजना, पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा व नागरी
सेवा यांचे नियोजन करते.
जनगणना
2027 संदर्भातील कामकाजासाठी धुळे महानगरपालिका क्षेत्रात
स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा कार्यरत करण्यात आलेली असून जनगणना कार्य
सुरळीत पार पाडण्यासाठी विविध
अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
प्रधान
जनगणना अधिकारी (Principal Census
Officer)
प्रधान
जनगणना अधिकारी हे जनगणना प्रक्रियेचे
प्रमुख अधिकारी असून संपूर्ण महानगरपालिका
क्षेत्रातील जनगणना कामकाजाचे नियोजन, नियंत्रण व देखरेख करतात.
प्रधान
जनगणना अधिकारी:
श्री. नितीन कापडणीस, आयुक्त, धुळे महानगरपालिका
शहर
जनगणना अधिकारी (City Census
Officer)
शहर
जनगणना अधिकारी हे शहर स्तरावर
जनगणना प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडण्यासाठी जबाबदार
असतात. जनगणना क्षेत्रांचे नियोजन, प्रगणक व पर्यवेक्षक यांचे
मार्गदर्शन तसेच माहिती संकलन
प्रक्रियेचे नियोजन करणे ही त्यांची
जबाबदारी असते.
शहर
जनगणना अधिकारी:
श्री. हेमंत निकम, उपायुक्त, धुळे महानगरपालिका
विभाग
प्रमुख
(Department Head)
विभाग
प्रमुख हे महानगरपालिका स्तरावर
जनगणना विभागाचे प्रमुख अधिकारी असून जनगणना कामकाजाचे
समन्वय, देखरेख व मार्गदर्शन करतात.
विभाग
प्रमुख:
श्री. रविकिरण पाटकरी
मोबाईल क्रमांक: 9423516511
चार्ज
कार्यालय माहिती (Charge Office
Details)
जनगणना
2027 प्रभावीपणे पार पाडण्यासाठी महानगरपालिका
क्षेत्राचे चार्ज कार्यालयांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक
चार्ज कार्यालयांतर्गत काही निश्चित प्रभाग
समाविष्ट असून संबंधित चार्ज
अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जनगणना कामकाजाचे नियोजन, अंमलबजावणी व देखरेख केली
जाते.
चार्ज
स्तरावरील प्रमुख कामे:
चार्ज
कार्यालय क्र. 1
चार्ज
कार्यालय क्र. 2
चार्ज
कार्यालय क्र. 3
चार्ज
कार्यालय क्र. 4
जनगणना
2027 – टप्पानिहाय
माहिती
(Phase-wise Information)
भारत
सरकार व महाराष्ट्र शासन
यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनगणना 2027 ही धुळे येथे
डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
आयुक्त
यांची प्रधान जनगणना अधिकारी व उपायुक्त यांची
शहर जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहराचे
4 चार्ज कार्यालयांमध्ये विभाजन करण्यात आले आहे.
महानगरपालिका
स्तरावर:
स्वयं
नोंदणी कालावधी (Self-Enumeration
Period)
नागरिकांना
अधिकृत जनगणना पोर्टलवर स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येईल. ही
प्रक्रिया सोपी, जलद व पारदर्शक
आहे.
टप्पा
1: घरगुती नोंदणी व गृहनिर्माण जनगणना (Phase I)
संकलित
माहिती:
टप्पा
2: लोकसंख्या जनगणना (Phase II)
संकलित
माहिती:
नागरिकांसाठी
सूचना
(Important Appeal)
धुळे
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी जनगणना
2027 या उपक्रमास सहकार्य करावे व अचूक माहिती
द्यावी.
अचूक
माहितीमुळे शहराचा सर्वांगीण विकास साध्य होतो.

Dhule Municipal Corporation
Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation