विभागाची माहिती

Key Contacts

HOD

HOD Name: 

पदनाम शहर अभियंता

Mobile No.

ई-मेल आयडी dhule_dmc@rediffmail.com

नोडल ऑफिसरचे नाव:श्री. एन.के.बागुल

पदनाम: शाखा अभियंता (विद्युत)

Mobile No: +91 9422296214

विभागाची माहिती

विभागाचा पत्ता: First नवीन प्रशासकीय इमारत,धुळे महानगरपालिका,धुळे - ४२४००१

Phone No: +91 2562 288301/2/3

ई-मेल आयडी:- dhule_dmc@rediffmail.com

आमच्याविषयी:

आमच्या विषयी: धुळे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून प्रामुख्याने महानगरपालिकेतील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या विद्युत यंत्रणेच्या व्यवस्थापनाचे कामकाज पाहिले जाते. शहरात कार्यक्षम विद्युत यंत्रणा बसविणे, सार्वजनिक विद्युत यंत्रणेचा विशिष्ट दर्जा निर्माण करणे , वाहन आणि पादचारी सुरक्षेसाठी रस्त्यांवर योग्य प्रकाशव्यवस्था निर्माण करणे आणि एलईडी दिवे व सौर उर्जा वापर करून वीज बचत करण्यावर विभागाचा अधिक भर आहे.

आमच्या सेवा:- धुळे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९,चे प्रकरण ६ मधील कलम ६३(७)(१८)(१९), ६६, २४९, २५१ व २५२ नुसार महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रकाश व्यवस्था पाहिली जाते. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांवर दिव्यांची सोय करणे, मनपा भवन ,सांस्कृतिक भवने, नाट्यगृहे, शाळा, उद्याने, स्मशानभूमी, मनपा दवाखाने, या सर्व ठिकाणी प्रकाश व्यवस्था व देखभाल दुरूस्ती व विद्युत प्रकल्पाच्या कामांचा समावेश असतो. याबरोबरच गणपती उत्सवात घाटावरील प्रकाश व्यवस्था व विविध कार्यक्रमाकरिता लागणारी तात्पुरती प्रकाश व्यवस्था,ध्वनी प्रक्षेपण व्यवस्था विद्युत विभागामार्फत केली जाते.

धुळे मनपाच्या विविध इमारतींमध्ये, उद्यानांमध्ये व रस्त्यांवर करावयाची प्रकल्पविषयक कामे खात्यांमार्फत केली जातात. मनपाच्या स्मशानभुमींमध्ये गॅस शवदाहिन्या बसविणे, वुडपायर यंत्रणा बसविणे यासारखी वैशिष्ट्यपूर्ण कामे करणे. तसेच उर्जा बचत, पर्यावरणपूरक दृष्टीकोन व अपारंपारीक उर्जा स्त्रोत वापरण्यावर भर देण्यासाठी उद्यानांमध्ये सोलर दिवे बसविणे, एल.ई.डी.फिटींग बसविणे, विविध इमारतीमधील एनर्जी ऑडिट करून घेणे, इत्यादी प्रकल्प उपलब्ध आर्थिक तरतूदीनुसार राबविले जातात. उभारलेल्या संपूर्ण विद्युत यंत्रणेसाठी येणा-या वीज खर्चासाठी म.रा.वि.कं. लि. कडून प्राप्त बीले अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते.