धुळे हे धुळे जिह्ल्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय मुख्यालय आहे.या शहराचे शहर नियोजन सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी केले.या शहरातून महत्वाचे ३ राष्ट्रीय महामार्ग जातात एनएच-3, एनएच -6 आणि एनएच -211.धुळे आणि नाशिक दरम्यान आधुनिक सुविधा असलेल्या राष्ट्रीय महामार्ग -3 मध्ये सध्याच्या चार पदरी कारणातून सहा पदरीत रूपांतरीत करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.धुळ्यात गोंदूर येथे राष्ट्रीय विमानतळ आहे.धुळे शहरामध्ये रेल्वे टर्मिनस आहे, जो चाळीसगाव येथे जवळच्या रेल्वे जंक्शनशी जुडलेला आहे. धुळे शहर हे पाचवे शक्तीपीठ आदिशक्ती एकविरा देवी साठी प्रसिद्ध आहे.राजवाडे संशोधन मंडळ हे धुळ्यातील एक प्रसिद्ध संग्रालय आहे.हे संग्रालय १९३२ साली स्थापन करण्यात आले ज्यात प्रसिद्ध एतिहासकार व्ही के राजवाडे यांनी गोळा केलेल्या वस्तूंचा मोठा संग्रह आहे.