• प्रभाग समिती कार्यालय

    धुळे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना स्थानिक पातळीवर सेवा अधिक जलद व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी शहराचे ४ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात काही प्रभाग समाविष्ट असून त्या प्रभागांमधील नागरी सुविधा, परवाने, स्वच्छता, अतिक्रमण कारवाई, जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी व इतर स्थानिक प्रशासनाची कामे संबंधित प्रभाग समिती कार्यालयामार्फत केली जातात.

    प्रभाग समिती कार्यालयांमुळे नागरिकांना महानगरपालिकेच्या सेवांसाठी मुख्य कार्यालयात जाण्याची आवश्यकता कमी होते व स्थानिक पातळीवरच सेवा उपलब्ध होतात. प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयामध्ये प्रभाग अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, परवानगी प्रक्रिया व विविध नागरी सेवा उपलब्ध करून देतात.

    क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाचा पत्ता, अधिकाऱ्याचे नाव व पद

    .क्र.

    क्षेत्रीय कार्यालय

    प्रभाग क्र.

    एकूण लोकसंख्या

    .

    क्षेत्रीय कार्यालय क्र.

    कार्यालयाचा पत्ता - नवरंग पाण्याची टाकी इमारत देवपूर

    , , , , ,

    ,३४,१०८

    .

    क्षेत्रीय कार्यालय क्र.

    कार्यालयाचा पत्ता मनपा शाळा नं २ ची इमारत, सुभाष पुतळ्याजवळ

    , ११, १२, १५

    ,०२,९९४

    .

    क्षेत्रीय कार्यालय क्र.

    कार्यालयाचा पत्ता मनपा शाळा नं.५ ची इमारत मनोहर टाकीजवळ, आग्रा रोड

    १३, १४, १६, १८, १९

    ,१०,३८७

    .

    क्षेत्रीय कार्यालय क्र.

    कार्यालयाचा पत्ता अशोक नगर जलकुंभ येथील, स्टाफ क्वार्टर्स, लेनिन चौक

    , , १०, १७

    ९९,६०५


    प्रभाग समिती कार्यालयाची प्रमुख कामे 

    प्रभाग स्तरावर नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खालील कामे केली जातात:

    1. प्रभाग स्तरावर दैनंदिन स्वच्छता विषयक कामकाज पार पाडणे.

    2. स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी करणे.

    3. तात्पुरत्या जाहिरात फलकांना परवानगी देणे व अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करणे.

    4. तात्पुरत्या मंडपांना परवाना देणे.

    5. अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे.

    6. धोकादायक इमारतींबाबत आवश्यक कारवाई करणे.

    7. बेवारस वाहनांवर कारवाई करणे.

    8. विवाह नोंदणी विषयक कामकाज पार पाडणे.

    9. दैनिक परवाने देणे व शुल्क वसुली करणे.

    10. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची प्रभाग स्तरावर अंमलबजावणी करणे.

    11. साठा परवाना देणे व शुल्क वसुली करणे.

    12. जन्म व मृत्यू दाखल्यांच्या नोंदी व वितरण करणे.

    13. नागरी सुविधा केंद्र स्थापन करणे व सेवा नियमित ठेवणे.

    14. ग्रंथालय व वाचनालय व्यवस्थापन विषयक कामकाज पाहणे.

    15. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे.


        प्रभाग अधिकारी संपर्क माहिती

    क्षेत्रीय कार्यालय

    प्रभाग अधिकारी

    कार्यक्षेत्र (प्रभाग)

    संपर्क क्रमांक

    कार्यालय क्र. 1

    श्री. किशोर शिंदे

    १, २, ४, ५, ६, ७

    ८६६८५१३५८७

    कार्यालय क्र. 2

    श्री. सागर जकातदार

    ३, ११, १२, १५

    ९८२२४९१२०१

    कार्यालय क्र. 3

    श्री. राजेंद्र माईनकर

    १३, १४, १६, १८, १९

    ९४२२७८६४०२

    कार्यालय क्र. 4

    श्री. किशोर वाघ

    ८, ९, १०, १७

    ९४२२३३३७१९

    Dhule Municipal Corporation
    Welcome to WhatsApp Chatbot for Citizens of Dhule Municipal Corporation

    Dhule Municipal Corporation
    Hi there 👋

    How can I help you?
    ×
    Whatsapp Chatbot